भंडारा जिल्ह्यातील तामसवाडी परिसरात रुग्णवाहिका अडकली चिखलमय रस्त्यात…..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या तामसवाडी (भेदरे) येथे एका गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्याकरिता येणारी ॲम्बुलन्सच चिखलात अडकली. अखेर महिलेलाच गावातून रुग्णवाहिकेपर्यंत पायदळ चिखल तुडवत रस्ता पार करावा लागला. दरम्यान ट्रॅक्टरच्या मदतीने फसलेल्या रुग्णवाहिकेला बाहेर काढत महिलेला सदर रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात पाठवण्यात आले. चिखलमय रस्त्यामुळे दोन जीवांवर जीवन मरणाचा प्रश्न उद्भवल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें