हवामान विभागाने भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केली असून दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचून दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या पूर परिस्थितीप्रमाणे परिस्थिती उद्भवू नये रस्ते महामार्ग बंद होऊन विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नये याकरिता जिल्हाभरातील शाळांना सुट्टी जाहीर केली असून शाळा आज बंद पाहायला मिळत आहेत तर विद्यार्थी सुखरूप घरी आहेत. सद्यस्थितीत रिमझिम पाऊस अजूनही जिल्हाभरात सुरू असून वैनगंगेतील पाणी पातळी आता वाढण्याची शक्यता असल्याने गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 21 दरवाजे उघडण्यात आले असून यातून पाण्याच्या विसर्ग करण्यात येत आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 35