भंडारा जिल्हात प्रथमच आढळला दुर्मिळ फॉस्टेन कॅट स्नेक… ग्रीनफ्रेंड्सच्या सदस्यांनी रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडले…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्याच्या लाखनी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे सर्पमित्र पथक पावसाळा ऋतू लागल्या बरोबर सक्रीय झाले असून अनेक विषारी बिनविषारी साप व जंगली प्राण्यांची सुरक्षित सुटका नागरिकांच्या घरून व शेतातून करीत आहेत व पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महान कार्य करीत आहेत.यातच केसलवाडा रोडवरील एम.डी.एन फ्युचर स्कूल येथे स्वच्छतागृहात साप असल्याची माहिती सरीसृप यांना मिळाली.ते तात्काळ घटनास्थळी साप रेस्क्यू करायला गेले असता त्यांना दुर्मिळ प्रकारचा फॉस्टेन कॅट स्नेक आढळला त्यांनी रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवनदान दिले आहे.फॉस्टेन कॅट स्नेक हा साप प्रथम जिल्हात आढळून आला आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें