स्थानिकांमधून व्यक्त होत आहे संताप…… मार्ग दुरुस्त करण्याची मागणी
भंडाराच्या माटोरा येथील मुख्य मार्गाची मागील अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली असून मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. या परिसरातील अनेक गावाला जाण्याकरिता हा मुख्य रस्ता असून नागरिकांना प्रवासादरम्यान विविध अडचणीचा सामना करावा लागतो आहे. यासंबंधी प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला निवेदन देण्यात आली मात्र तरीसुद्धा प्रशासनाच्या वतीने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ आता संतापले असून मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करू इशारा येथील ग्रामस्थांनी दिलाय.

Author: vbn newsnetwork
Post Views: 34