अनेक छोटे नाल्यांवरून वाहत आहे पाणी…. नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये जिल्हा प्रशासनाचा इशारा…..
भंडारा जिल्ह्यात मागील 24 तासापासून पावसाची संततदार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, ओसंडून वाहन आहेत. तर ग्रामीण भागातील छोटे नाले हे दुतळी भरून वाहत असून अनेक नाल्यांवरून पाणी वाहत आहे. तुमसर तालुक्यातील सीलेगाव – वाहनी येथील नाल्यावर दोन फूट पाणी असल्यामुळे दोन्ही गावांचा ये जा करण्याच्या संपर्क तुटलेला आहे. तर बावनथडी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या पुलावर पाणी असताना नागरिकांनी पुलावरून जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तर अनेक शेतकऱ्यांची शेती सुद्धा पाण्याखाली गेली असून या पावसाचा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसलेला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 41