लाखनी तालुक्यातील पोहरा या गावी राहणारा शेतकरी गिरीश नगरकर याच्या कडे दोन एकर शेती आहे. मागील दोन चार वर्षा पासन तो शेतात टमाटर ची लागवड करत असतो.मागील वर्षी टमाटर ला प्रति कॅरेट 400 ते 500 रुपये भाव मिळाला होता.मात्र ह्या वर्षी टमाटर ला बाजारपेठेत कमी भाव मिळत असून प्रति कॅरेट 40 ते 50 रुपये जात असल्याने शेतकऱ्यानी लागवड केलेल पैसे सुद्धा निघत नसल्याने जगायचं कस हा प्रश्न पडला असून बाजारात टमाटर ची घसरण झाल्याने शेतकरी बेजार झाला आहे.
