साकोली व लाखनी तालुक्यात १५० एकर वरून अधिक पेरिव धान लागवड करण्यात आली.धान शेतीतील उत्पादकता वाढविण्याच्या व उत्पादन खर्च कमी करणाच्या दृष्टीने तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच भात लागवड पध्दतीमध्ये सुद्धा बदल करणे गरजेचे आहे यावर उपाय म्हणुन कृषी विज्ञान केंद्र साकोली तर्फे अनेक वर्षापासून डॉ. उषा डोंगरवार वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांच्या मार्गदर्शनमध्ये व संजय सिंह (मार्केट डेवलपमेंट अग्रोनोमिस्ट) यांच्या मदतीने सार्वजनिक -खाजगी भागीदारी पद्धतीने साकोली परिसरात गेल्या ०३ वर्षापासून प्रयोग राबविल्या जात आहे. याचाच परिणाम म्हणुन साकोलीव लाखनी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी धान पेरणीसाठी पेरणी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात करतांना दिसत आहेत.
या प्रयोगांतर्गत श्री. गणेश खटोले रा. धर्मपुरी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की , मजुरांचा तुटवडा हि एक समस्या असून त्यावर यांत्रिकीकरण हाच पर्याय आहे. बदलत्या हवामानानुसार वापरासोबतच, निविष्ठांचा कार्यक्षम वापर, वेळेवर व योग्य मात्रेत खते-बीयाणे पेरणी, उत्पादन खर्चात घट, शेतीतील कष्ट कमी करणे, कीड व रोगांचा प्रादुर्भावसुद्धा कमी होतो. रोवणी पद्धतीने होणाऱ्या उत्पादना एवढेच उत्पादन यामुळे होते परंतु रोवणी पद्धतीत चिखलणी, धानाची रोपवाटिका तयार करणे, व्यवस्थापन, रोपांची वाहतूक करणे व पुर्नलागवड (रोवणी) करणे यांसारखे वेळखाऊ व जास्त खर्चाचे कामे यामुळे कमी होते.
श्री.योगेश महल्ले विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी), महेन्द्र जामुनपाणे (क्लस्टर इंचार्ज, बायर डायरेक्ट एकर्सच्या) व श्री. मोहन कापगते (फील्ड ऑफिसर बायर डायरेक्ट एकर्स) यांनी या प्रायोगासाठी सहकार्य केले. आतापर्यंत साकोली व लाखनी तालुक्यात जवळपास १५० एकर वरून अधिक धानाची लागवड पेरणी यंत्राचा वापर करून करण्यात आली आहे. थेट पेरिव धान लागवड हि यंत्रांनी व्हावी यासाठी शेतकऱ्यांना पेरणी यंत्र पुरवठादार म्हणुन श्री.दिलीप शेंडे (मुंडीपार), दिलीप गहाने (सिरेगाव बांध) व श्री. विवेक परशुरामकर (साकोली) यांच्याशी समन्वय साधता येईल.
