गोसेखुर्द प्रकल्पाच्या बैंकॉटरमुळे दरवर्षी महापुराचा सामना करणाऱ्या कारधा गावातील व पुनर्वसन रखडलेल्या नागरिकांनी अखेर संतापाचा विस्फोट करत जिलहाधिकारी कार्यालयात चुली पेटवून तीव आंदोलन छेडले. ‘पुनर्वसन करा, अन्यथा जलसमाधी’, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती व पूरग्रस्त 22 गावांतील शेकडो नागरिक सहभागी झाले होते, आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून निषेध नोंदवला आणि लेखी निवेदनाद्वारे आपल्या मागण्या मांडल्या.

Author: vbn newsnetwork
Post Views: 32