पालकमंत्री भोयर यांच्या भेटीत माजी खा. सुनिल मेंढे यांनी मांडल्या विविध समस्या…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्यातील सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि अन्य महत्वाच्या मुद्द्यांना घेऊन माजी खासदार सुनील मेंढे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांची भेट घेत चर्चा केली.  या महत्वाच्या विषयांवर तोडगा काढला जावा, अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर जिल्हा दौऱ्यावर आले असता सुनील मेंढे यांनी ही भेट घेतली व निवेदन दिले. जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही विभागाचे शिक्षणाधिकारी प्रभारी आहे. परिणामी याचा प्रभाव शिक्षण व्यवस्थेवर होतं आहे. त्यामुळे नियमित शिक्षणाधिकारी देण्यात यावे, सर्व शासकीय अनुदानित आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये सोलर ची वीज उपलब्ध करून द्यावी, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अटींमध्ये शिथिलता द्यावी, रमाई आवास योजनेप्रमाणे एस सी/ एस टी घटकांकरिता तीन वर्षांच्या पावतीच्या आधारे घरकुल योजना मंजूर होत आहेत. त्याच धर्तीवर प्रधानमंत्री आवास योजनेमध्येही अशीच शिथिलता देण्यात यावी, नवीन टाकळी येथील वारस नोंदी व भंडारा शहरातील पट्ट्यांचा प्रश्न निकाली काढला जावा,  खाजगी मालमत्तांवरील चुकीच्या सरकारी पट्ट्यांची नोंद काढण्यात याव्या,  साकोलीतील नागरिकांना घरकुलासाठी जागेची गरज आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्यासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी,  यावर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी माजी खासदार सुनील मेंढे यांनी केली. या विषयांच्या अनुषंगाने योग्य तो तोडगा काढण्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.याप्रसंगी बाळा अंजनकर, डॉ. उल्हास फडके, बिडीसीसी चे उपाध्यक्ष प्रदीप पडोळे, जिल्हा अध्यक्ष आशु गोंडाणे, मुकेश थानथराटे, मयूर बिसेन, प्रशांत खोब्रागडे, मंगेश वंजारी, प्रकाश बाळबुध्ये, कृष्णकुमार बत्रा आदी उपस्थित होते.

   

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें