पवनी उमरेड कऱ्हाडला अभयारण्यातील एफ-२ या वाघिणीने पर्यटकांना भुरळ घातली आहे.एफ-२ वाघीण आणि तिचे पाच बछड्यांचे पर्यटकांना दर्शन होत असल्यानं पर्यटक सुखावले आहेत.त्यांचे अनेक व्हिडिओही यापूर्वी व्हायरल झाले आहेत.आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.ज्यामध्ये हे पाचही बछडे एफ-२ वाघिणीसोबत मॉर्निंग वॉकसाठी निघाले असून मार्गावर मस्ती करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पेंच येथील कौशल नेवारे यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.मातृत्वाची सुखद अनुभूती फक्त माणसेच अनुभवतात असे नाही, किंबहुना अधिक जास्त ती प्राण्यांमध्ये दिसून येते.वाघांबाबत बोलायचे तर दोन वर्षांपर्यंत हे बछडे वाघिणीसोबतच राहतात.या कालावधीत ती त्यांना खाऊ घालण्यापासून तर शिकार करण्याचे प्रशिक्षण देते.
यादरम्यान मातृत्त्वाचा सोहोळा त्यांच्यातही रंगलेला दिसून येतो.असाच एक अविस्मरणीय प्रसंग उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी अनुभवला.‘एफ २’ ही वाघीण तिच्या सहा महिन्यांच्या दोन बछड्यांसह त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची भ्रमंती करताना दिसून आली.दरम्यान भ्रमंती मार्गावर बछड्याची आईसोबत मस्ती सुरू होती.हा व्हिडीओ उमरेड पवनी करंडला अभयारण्यतील गोठणगाव सफारी दरम्यान काढला गेला.
