नहरात आंघोळीला गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथे भाऊ व मित्रासोबत आंघोळीला गेलेल्या बालकाचा तामसवाडी शिवारातील बावनथडी प्रकल्पाच्या नहरात बुडून मृत्यू झाला. मोहम्मद रजा रफिक शेख (८) रा. शिवाजीनगर तुमसर असे मृत बालकाचे नाव आहे.

मोहम्मद रजा हा त्याचा मोठा भाऊ अहमद व काही मित्रांसोबत शहराच्या बाहेरील तामसवाडी रस्त्याला छेदून गेलेल्या नहरात आंघोळीला गेले होते. पाण्याच्या अंदाज न लागल्याने मोहम्मद हा पाण्याच्या प्रवाहात ओढत गेला. दरम्यान, त्याच्या मोठ्या भावाने वाचवावाचवा असा ओरडू लागला. तोपर्यंत मोहम्मद हा नहरातील पाण्यात बुडाला. परिसरात कुणीच नसल्याने या बालकांच्या मदतीसाठी कुणीही येऊ शकले नाही. या घटनेने सर्व मुले प्रचंड घाबरली होती. मोहम्मदच्या कुटुंबाला ही दुर्दैवी माहिती मिळताच कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें