शेतकऱ्यांची दिवसेंदिवस होत चाललेली गळचेपी,केंद्र व राज्य सरकारकडून त्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष या बाबी देशांच्या पोशिंदासाठी मारक आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची जाहीर केलेली रक्कम तातडीने द्या, तसेच डीबीटीची रक्कम तातडीने खात्यात जमा करावी आणि शेतकऱ्यांना धान जगवण्यासाठी सिंचनाची गरज असल्याने त्यांना 24 तास वीज द्यावी व धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी होणारा विलंब दूर करून तातडीने केंद्र सुरू करावी अशी मागणी करत भंडारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले.
