चोरट्यांनी तुमसर रोड स्टेशन टोली देव्हाडी परिसरातील 6 दुकाने आणि तुमसर शहरातील एका पानटपरीचे शटर उचकटून चोरी केल्याची घटना मध्यरात्री घडली. सलग चार दिवसांत दुसऱ्यांदा घडलेल्या चोरीच्या घटनांनी नागरिकांत संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.बोसनगर मार्केट परिसरातील 6 दुकाने फोडून रोकड व वस्तू लंपास केल्या गेल्या. या घटनेतील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत.त्यानंतर पुन्हा बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी तुमसर रोड स्टेशन टोली परिसरातील सहा दुकाने फोडली.संपूर्ण घटनेत पोलिसांची भूमिका केवळ घटनास्थळी पंचनामा व छायाचित्रे घेण्यापुरती मर्यादित असल्याचे स्पष्ट दिसून -येते. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असला तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत असून व्यापाऱ्या मध्ये चोरट्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
