हवा प्रत्येक पंपावर मोफत दिली पाहिजे त्यासाठी चौकशी करून कारवाई करणार असल्याचं पुरवठा विभागाचे म्हणणे आहे….
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथील भारत पेट्रोल पंपावर हवा भरण्यासाठी घेतलें जातात पैसे. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक पेट्रोल पंपावर मूलभूत सुविधा असणे गरजेचे आहे. त्याच हवा, पाणी, स्वच्छालय असायलाच पाहिजे. तर हवा मोफत भरली जाते. पण देवरी येथील मोदी पेट्रोल पंपावर हवा भरायची असेल तर पैसे मोजावे लागतात. तसा दर पत्रक लावण्यात आले आहे. जे चुकीचे आहे. असं कोणताही पंप मालक दर पत्रक लावत असेल त्याच्यावर कारवाई केली जाते. आता या संबंधित जिल्हा पुरवठा विभागाने चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
