उत्तीर्ण होणाऱ्या टॉपर्स विद्यार्थ्यांना मिळणार आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन……
पोलीस विभागाने सुरू केलेल्या दिशा प्रकल्पांतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले जात असून भंडारा जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात या प्रकल्पाअंतर्गत स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या. जवळपास 2000 हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवला. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या टॉपर्स विद्यार्थ्यांना पुण्यातील आयएएस आयपीएस अधिकारी व नामांकित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकांकडून ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन दिले जाणार आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 32