दहावी बोर्डाच्या परीक्षेत भंडाऱ्यातील नूतन कन्या विद्यालयाची रागिनी भुरे प्रथम……

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

तर जिल्ह्याचा निकाल ८८.४८ टक्के……..९३.१९ टक्के मुलींनी यश मिळवले, मुले ९.१० च्या फरकाने राहिले मागे…

दहावीच्या (एसएससी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून भंडाऱ्याच्या नूतन कन्या शाळेने माध्यमिक शालांत परीक्षेतही उंच भरारी घेतली आहे. शाळेची विद्यार्थिनी रागिणी गोवर्धन भुरे हिने 500 पैकी 499 गुण (99.80 टक्के) मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. भंडारा जिल्ह्यातील १३,३४७ नियमित विद्यार्थी त्यात उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ८८.४८ असून मुलींचा निकाल ९३.१९ टक्के तर मुलांचा ८४.०९ टक्के लागला आहे. या परीक्षेत मुलींनी मुलांवर ९.१० टक्क्यांच्या फरकाने मात केली आहे. या परीक्षेला जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी ७,८४३ मुले आणि ७,२९० मुलींसह एकूण १५,१३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ७,८०९ मुले आणि ७,२७५ मुलींसह एकूण १५,८०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६,५६७ मुले आणि ६,७८० मुलींसह १३,३४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा जिल्ह्यात उत्तीर्णाचे आणि टक्केवारीचे प्रमाण अधीक आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें