दर पत्रक न लावता वाळू डेपो मालक शासनाच्या नियमांनी करतो पायमल्ली….. खनीकर्म अधिकारी व महसूली अधिकारी यांना दर पत्रक दिसत नाही का???

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सध्या भंडारा जिल्ह्यातील वाळूचा मुद्दा विधानसभेत गाजत असताना मात्र भंडारा जिल्ह्यात वाळू डेपो मालक बिनधास्त पने वावरत आहेत. जणू वाळू डेपो चालकांना कायद्याचा धाक उरलेला नाही. लाखांदूर तालुक्यातील मोहरना वाळू घाट बिनधास्तपणे सुरू आहे. हा वाळू घाट लिलाव झाला असला तरी शासनाने ठरविलेले दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. पण वाळूघाट चालक शासनाच्या नियमाची पायमल्ली करताना दिसत आहे. वाळू डेपोवर कुठलाही दरपत्रक लावण्यात आलेला नाही. वाळू डेपोवर महसुली अधिकारी व खणीकर्म अधिकारी वारंवार भेट देत असून देखील या अधिकाऱ्यांना दरपत्रक दिसले नाही का?? हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तर प्रत्येक वाळू डेपोवर महसूल विभागातर्फे तपासणी केली जात असताना देखील मोहरणा वाळू डेपो यातून कसा सुटला हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें