“थाळी वाजवा – घर वाचवा” अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांना नोटीस बजावण्यात आली आहे…. त्याचा विरोध म्हणून आंदोलन करण्यात आले….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरातील शिवाजी महाराज चौक येथून तहसील कार्यालयावर “थाळी वाजवा – घर वाचवा” मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पवनी शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाईला तात्पुरती स्थगिती मिळावी या मुख्य मागणीसाठी आयोजित करण्यात आला होता.
तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. सध्या कारवाईचे आदेश निघाले आहेत आणि अनेकांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. जर आपल्या घरावर बुलडोझर चालला तर आपण राहायचं कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर महिला , पुरुष, लहान मुलांनी देखील सहभाग घेतला होता.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें