सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या छोटा महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायमुख तीर्थक्षेत्रात महाशिवरात्रि निमित्त असंख्य भाविक हजेरी लावत दर्शन घेत असतात.
तुमसर तालुक्यात असलेले हे तीर्थक्षेत्र तुमसर पासून अवघ्या 20 किमी अंतरावर आहे. छोटा महादेव नावाने प्रसिद्ध असलेल्या देवस्थानात नवस फेडन्यासाठी भंडारा जिल्हातील यात्रेकरू सह बालाघाट, शिवनी,राजनांदगांव दुर्ग या भागातील जवळ जवळ 1 लाख भाविक हजेरी लावतात. या मंदिर परिसरात असलेल्या गोमुख़ातून 12 ही महीने पानी वाहत असल्याने अनेक भाविक नवस फेडायला विशेष पोहे घेऊन येतात. व ह्या गोमुखातुन निघणाऱ्या पाण्यात आंघोळ करतात. येथे आंघोळ केल्याने आपल्या व्याध्यि बऱ्या होत असल्याच्या समज येथिल भाविकात आहे. त्यामुळे 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेत या तीर्थक्षेत्राला धार्मिक,सांस्कृतिक, व सामाजिक वारसा असल्याने असंख्य भाविक हजेरी लावतात हे विशेष
