अनुसूचित जाती व बौद्धांच्या कल्याणासाठी मंजूर झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निधीतून “लाडकी बहिण योजनेसाठी” ४१०.३० कोटी रुपये वळविण्यात आले.अनु. जाती/जमाती व इतर मागास वर्गाच्या हक्काचे निधी इतरत्र वळवू नये. अनूसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण व अनुसूचित जाती जमातीना क्रिमीलेअर न लावणे बाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायलायाचा निर्णय रद्द करणे,तसेच महाराष्ट्रात उपवर्गीकरण साठी स्थापित झालेली समिती बरखास्त करण्यात यावी.भटक्या विमुक्तांच्या घरकुलांसाठी असणारी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत नवीन उद्दिष्ट न घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या घरकुल योजनेत नवीन घरकुल उद्दिष्ट घेणे सुरू ठेवावे जेणेकरून राज्य पुरस्कृत घरकुल योजना सुरू राहतील.१४००० जिल्हा परिषद, नगरपरिषद शाळा बंद करण्याचे निर्णय रद्द करावे.स्वाधार योजनेच्या धर्तीवर ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरु झालेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्या साठी असलेली ६०% गुणांची अट निरस्त करून सर्व ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा.विद्युत महामंडळातर्फे ग्राहकांवर स्मार्ट मीटर स्थापनेची सक्ती निरस्त करण्यात यावी.अश्या विविध मागण्या करिता डाँ.बाबासाहेब आंबेडकर जागृत युवा संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्या करिता धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
