नागपूर-रायपूर महामार्गावरील लाखनी उड्डाण पुलावर मोटरसायकल व ट्रकचा भीषण अपघात होऊन दोन युवक गंभीर जखमी झाले.गंभीर जखमींमध्ये तुषार सुधाकर कुडेगावे (२७, पालांदूर चौरस), रोहित नामदेव भिवगुडे (२०, कोदामेडी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) यांचा समावेश आहे दोघेही दुचाकी क्रमांक एमएच ४० सीबी २३८९ ने लाखनीकडून भंडाऱ्याकडे येत होते.दरम्यान लाखनी उड्डाण पुलावर उभ्या असलेल्या ट्रकला (क्रमांक एमएच ४० सीडी ६७१४) दुचाकीने जबर धडक दिली.यात रोहित व तुषार यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 9