भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील बस स्टँड समोर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. कौशल्य डहाट असे मृत महिलेचे नाव आहे. मृतक महीला ही रस्त्याने जात असताना मागवून येणाऱ्या ट्रक ने जोरदार धकाड दिली ट्यात दुचाकीचा तोल गेल्याने महीला ट्रकच्या मागिल चकात आल्याने महिलेचा चेंदा मेंदा झाला आहे. हा ट्रक खात घेऊन बपेरा येथे जात असताना हा अपघात झाला. अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. नेहमीच तुमसर बस स्टँड परीसरात रस्त्यांवर वाहने पार्किंग केली जातात त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाला याचा त्रास सहन करावा लागत आहे. आज या ट्रॅफिक मुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. तर तुमसर पोलीसांनी ट्रकला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
