भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील सोमनारा येथे ट्रकने दोघांना जोरदार धडक दिली यात एक जागीच ठार तर एकाचे दोन पाय निकामी झाले आहे. दोन्ही मुले मासळ वरून स्वगावी परत जात असताना सोमनाळा गावाजवरील वळणावर सायंकाळी 6:30 च्या सुमारास ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली यात एकाचा ट्रक मध्ये दबून मृत्यू झाला तर एकाच पाय निकामी झाले असून त्याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सद्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी करीता रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. सद्या घटनास्थळी पोलिस अधीक्षक सह पोलिसांचा फौज फाटा तैनात आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 3