पोलीसांनी पाच आरोपीना अटक न करता तिघांनाच केली अटक…. पोलीसांनी दोघांकडून आर्थिक देवाण घेवाण केल असल्याचं केलं आरोप
भंडारा शहराला लागून असलेल्या गीरोला येथे जुन्या वैमनस्यातून पाच जणांच्या टोळक्याने एका युवकाला बेदम मारहाण केली आहे. यात पिढीत यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु असुन पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. पण दोन आरोपी कडून पोलीसांनी आर्थिक देवाण घेवाण केलं असल्याचा केला आरोप
भंडारा शहरापासून 3 किलोमिटर अंतरावर गिरोला गावातील महादेव कोरे यांचा गावातीलच काही लोकांसोबत वाद होता. या वादाचा वचपा काढण्यासाठी पाच लोकांनी एकत्र येत महादेव यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. या त्यांच्या डोक्याला पायाला जबर जखम झाली आहे. सद्या महादेव यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. महादेव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन लोकांना अटक केली आहे. पण महादेव कोरे यांना पाच लोकांनी मारहाण केली असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगीतले पण पोलीसांनी आर्थिक देवाण घेवाण करून दोघांना सोडून दिल असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे
तर या संदर्भात कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ यांना विचारले असताना त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहे. तक्रारदारांनी जेवढे नावे सांगितली त्यांना अटक केली आहे. पण कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे. पण तक्रारदार यांनी पोलिसांवर आर्थिक देवाण घेवाणचे आरोप गंभिर आहेत त्यामुळे पोलीस अधिक्षक आता या प्रकरणात संपुर्ण चौकशी करून पिढीत महादेव यांना न्याय देणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
