आधी तलावाच्या पाळीला बेंचिंग न करतच पाळ तयार…. नियमांना डावलून काम करत असल्याचा आरोप…. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ….
भंडारा जिल्ह्याच्या जांभोरा येथे 60 लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या वतीने मामा तलाव दुरुस्तीच काम सुरू आहे. पण कंत्राटदार स्वतःच्या मर्जीने काम करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. इस्टीमेट नुसार काम करीत नाही. त्यामुळे कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने काही दिवसात तलावाची पाळ जशीच्या तशी होणार आहे…
मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील मामा तलाव गट क्र ३१२ चे काम लघु पाटबंधारे विभाग जि. प. भंडारा यांना ग्रामपंचायतच्या वतीने उपसा तलाव खोलीकरण व पाटचारे सिमेंटीकरण करण्याचे काम मंजूर करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला. त्यानुसार काम मंजूर करण्यात आले. कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम कमी दराच्या निवीदा असणाऱ्या कंत्राटदाराला देण्यात आले त्यानुसार काम करण्यासाठी कंत्राटदार आले असता संबंधित कंत्राटदाराने ग्रामपंचायतीला कोणतीही पुर्व सुचना न देता काम सुरू करण्याची सुरुवात केली.
तसेच इस्टिमेट नुसार कंत्राटदार काम करत नाही आहे. आधी तलावाच्या पाळीवर बेंचिंग करून नंतर पळीवर माती मुरून घालायला पाहिजे होते पान कंत्राटदार स्व मर्जीने काम करीत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकरी करीत आहे. तर मध्यम प्रतिनिधि येणार कळतच कंत्राटदारांनी त्या दिवशी कामच बंद ठेवला होता.
तर या संदर्भात अधिकाऱ्यांनि अजब उत्तर दिला आहे. काम सुरू झालं मी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली नाही. नियमांनुसार काम होत नसेल तर तसा काम करू घेण्यात येणार आहे. पण कंत्राटदारांनी काम सुरू केल्यानंतर जिल्हा परिषद तांत्रिक अधिकाऱ्यांना माहिती नसणे म्हणजे शोकांतिका आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता किती दर्जेदार होणार ते यावरून दिसुन येते.
