भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ पोलिस ठाणे हद्दीत येणाऱ्या टेकेपार येथील धनराज कायते (५२) यांच्या राहत्या घरात आलमारीत ठेवलेले एक लाख चाळीस हजार रुपये चोरांनी लंपास केले होते. अड्याळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत श्वान पथकासह फिंगर प्रिंट एक्सपर्ट तथा सायबर क्राइम पोलिसांची मदत घेत अवघ्या काही तासांतच चोरट्यांना रोख रकमेसह अटक केली.

Author: vbn newsnetwork
Post Views: 2