महसूल विभाग द्वारे विविध आवास योजनेच्या लाभार्थ्यांना निशुल्क पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय घेण्यात अल. या निर्णया नंतर पवनी आणि भंडाराच्या 10 वाळू डेपोंचे उद्घाटन आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यातील वाळू घाटावरून शासकीय घरकुल योजनेच्या लभार्थीला वाळू मिळणे अवघड जात होते. या विषयाला गांभीर्याने घेत शासनाच्या मसुल विभागाने एक निर्णय पारित केला, ज्यात 1 जून ते 9 जून च्या दरम्यान आवास योजनेच्या लभार्थीला पाच ब्रास वाळू निशुल्क देण्यात येईल. या करीत भंडारा तालुक्यातील 62 गावातील 6324 लभार्थीला दोन घाटावरून तसेच पवनी तालुक्यातील 41 गावांची 1637 घरकुलांकरिता आठ घाटानवरून वाळू देण्यात येत आहे. या घटवरून 1 जून पासून वाळू वितरण सुरू करण्यात आले.

Author: vbn newsnetwork
Post Views: 3