लाखनी तालुक्यातील धानला ग्रामपंचायत ने अतिक्रमन केलल्या जागेवर विनापरवाना पक्के घराचे बांधकाम ग्रामपंचायतीने जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आले.
भंडारा जिल्हातील लाखनी तालुक्यातील धानला ग्रामपंचायत मधील गट क्रमांक २५१/२ मधील भूखंड क्रमांक १५० रिक्त असून व १५१ या सरकारी जागेवर पंकेश पडोळे यांनी अतिक्रमण केले होते.काही महिन्यांपूर्वी त्यांनी त्या ठिकाणी पक्के घराचे बांधकाम केले.यापूर्वी त्याठिकाणी त्यांचे पाळीव जनावरे राहत असायचे. दरम्यान,याबाबत पडोळे यांना ग्रामपंचायतने ने सदर गट क्रमांकावरील अतिक्रमण हटवण्याकरिता ४ नोटीसही बजावले होते. मात्र, नोटिसांना एकही उत्तर न देता पडोळे यांनी विनपारवाना बांधकाम सुरुच ठेवले.
दरम्यान, ग्रामपंचायत धानला ने सरपंच वैशाली संजय ठाकरे,उपसरपंच संदेश इलमकर,ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ,तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात या भूखंडावरील पक्के घराच्या बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आले.तर अतिक्रमण धारक पंकेश पडोळे यांनी ग्रामपंचायत वर आरोप केले असून घर पाडण्याचे नोटीस न देता आमचे घर पाडले त्यावर ग्रामपंचायत ने आमचे घराची भरपाई भरून द्यावी अशी मागणी केली आहे.
