गोंदिया जिल्ह्याच्या भानपुर येथे आज एक वाघ मृत अवस्थेत आढलून आला आहे. गोंदिया जिल्ह्यात नवेगाव नागझिरा अभयारण्य असुन या जंगलात वाघांचा अधिवास आहे. मात्र आज भाणपुर गावा शेजारी असलेल्या झुडपी जंगलात वाघ मृत अवस्थेत आढळून आला आहे. याची माहिती वनविभागाला होताच वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पण वाघाचा मृत्यू नॅचरल झाला की याचा पत्ता स्व विच्छेदन झाल्यानंतर कळेल. पण भंडारा गोंदिया जिल्ह्यात वाघांचा मृत्यू होत असल्याने वन विभागाच्या कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहेत
