गोंदिया – इटियाडोह धरण परिसरात वन्यप्राणी बिबट्याचा चार वर्षीय चिमुकल्यावर हल्ला,चिमुकला गंभीर जखमी,पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील इटियाडोह धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या चार वर्षीय चिमुकल्यावर वन्यप्राणी बिबट्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना दि.30 ऑगस्ट ला सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली.विहान भौतोष रॉय वय 4 वर्षे रा.दिनकरनगर असे या गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.सुदैवाने उपस्थित पर्यटकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.मिळालेल्या माहितीनुसार विहान आपल्या काका नामे अजय सरदार वय 25 वर्ष यांच्यासोबत गोठणगाव येथील इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे विहंगम दृश्यांची पाहणी करण्यासाठी आला होता.धरण बघून परत जात असताना विश्रामगृहाच्या जवळ असलेल्या गर्दीच्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकल्या विहानवर अचानक ही झडप घातली आणि चिमुकल्याला पायाने धरून जवळपास 100 फूट अंतरावर जंगलात फरफटत नेले.

काकाने सुरुवातीला बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर बिबट्याने पुन्हा एकदा विहानच्या गळ्याला पकडत आणखी आत ओढून नेले.यावेळी घटनास्थळी उपस्थित पर्यटकांनी आरडाओरड करत बिबट्याला पळवून लावण्यात यश मिळवले.या हल्यात विहानच्या गळ्याला गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.तात्काळ अर्जुनी/मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हलवण्यात आले आहे.उपचारासाठी पूजा पचारे व तेजराम पराते यांनी मोलाची मदत केली.गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरात बिबट्यांचे वावर वाढले असून यापूर्वीदेखील अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडल्या आहेत.या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वनविभागाने उपाययोजना करुन बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि चिमुकल्या विहानला नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें