गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत गोंदियात या वर्षी २२ ते २६ जानेवारी दरम्यान ५ दिवशीय जिल्हा स्थरीय पलाश मिनी सरस प्रदर्शनीचे आयोजन गोंदिया शहरातील भारतीय स्टेट बँके समोर असलेल्या सुभाष ग्राउंड मध्ये करण्यात आले असल्याची माहिती गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम यांनी दिली असून जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आव्हाहन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनीत उमेद अंतर्गत येत असेल्या बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री तसेच प्रदर्शनी भरविण्यात येणार आहे सोबतच विदर्भातील ताजे तवाणे तडाकेदार खाद्यपदार्थ ,विदर्भातील तरी पोहा ,चना पोहा, पातोळी ,गावरान कोंबळी चे तडकेदार चिकन,मटण, विविध कला कुसर, हात मागच्या वस्तू, पुरण पोळी ,लोणचे, पापड, कुरवड्या,आणखी आणि खूप काही मिळणार आहे .तर बच्चे कंपनी करिता देखील मुलांना खेळण्या साठी बाल मंच तयार करण्यात आला आहे .सोबतच विविध लोक कला, हास्य प्रदर्शन, संगीत मैफिल अश्या एका हुंन एक कार्यक्रमाची मालिकाच या पाच दिवशीय प्रदर्शनीत अनुभवायला मिळेल तयामुळे एकदा तरी या प्रदर्शनीला भेट द्या आणि ग्रामीण भागातील खाद्य पदार्थांचा आनंद घ्या
