गोंदियातील डॉ विकास जैन यांनी रुग्णाच्या पोटातून काढला १ किलो ६०० ग्रामचा किडनी स्टोन…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गोंदिया शहराच्या बीजे रुग्णालयातील लेप्रोस्कोपी तथा युरो सर्जन डॉ विकास जैन यांनी महिलेच्या मूत्रपिंडात अडकलेला १ किलो ६०० ग्राम वजनाचा किडनी स्टोन काढण्याचा विक्रम नोंदविला आहे.तर या आधी देखील डॉ विकास जैन यांनी १ किलो ५० ग्राम वजनाचा किडनी स्टोन काढण्याचा विक्रम नोंदविल्याने त्यांच्या या कार्याची दखल एशिया बुक्स ऑफ रेकॉर्ड ने घेतली होती तर गेल्या २५ वर्षांच्या काळात ६ हजार पेक्षा जास्त लोकांच्या पोटात असलेला किडनी स्टोन शस्त्र क्रिया करून डॉ विकास जैन यांनी काढला आहे.

गोंदिया जिल्याल्या लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्याच्या बालाघाट जिल्या अंतर्गत येणाऱ्या वारासिवनी गावातील ५२ वर्षीय कृष्णां सहारे या महिलेला गेल्या ६ वर्षा पासून किडनी स्टोनचा आजार असल्याने त्यांनी मध्यप्रदेश राज्यातील अनेक तज्ञ डॉक्तरांकडून उपचार करवून घेतले . मात्र किडनी स्टोनचा आजार बारा झाला नाही , तर त्यांना गोंदिया शहरातील बीजे हॉस्पिटल या ठिकाणी सेवा देत असलेल्या डॉ विकास जैन यांच्या बद्दल कुणी माहिती दिली असता .

ष्ण सहारे यांच्या कुटूंबियांनी त्यांना बीजे रूगनल्यात घेऊन आले असता ,डॉ विकास जैन यांनी सोनोग्राफी करून घेत मूत्रपिंडा जवळ एक गोळा आढळून आला असता हा गोळा मासाचा नव्हे तर किडनी स्टोन असल्याचे निदर्शनांश येताच डॉ विकास जैन यांनी रुग्णाची सहमती घेत तब्ब्ल २ तासाची शस्त्र क्रिया करवून घेत १ किलो ६०० ग्राम वजनाचा किडनी स्टोन महिलेच्या पोटातून काढण्याचा विक्रम केला आहे.

तर डॉ विकास जैन यांनी या आधी देखील अश्या अनेक दुर्मिळ शस्त्रकिया केल्या असून त्यांच्या या कार्याची दखल एशिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली आहे .तर त्यानी आपल्या कार्याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड ,लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड ,गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या कडे देखील नोंदविली आहे तर कृष्णां सहारे याना होणाऱ्या किडनी स्टोनच्या त्रासापासून मुक्तता मिळाल्याने सहारे कुटूंबियांनी डॉ विकास जैन यांचे आभार मानले आहे..

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें