गाडगेबाबा ग्रामस्वच्छ्ता अभियान चमू कडून टांगा गावाची पाहणी…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२५ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्पर्धा अभियान या चमू कडून ग्राम संसद ने भंडारा जिल्हातील मोहाडी तालुक्यातील टांगा गावाची तपासणी व निरीक्षण करण्यात आले. गावात स्वच्छतेचे निरीक्षण करण्यात आले. स्वच्छता व पाणीपुरवठा संदर्भातील आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अभियानात लागणाऱ्या निकशाची पूर्तता ग्रामपंचायत टांगां नी केली असून त्या निकशाची व प्रस्तावाची तपासणी करून संपूर्ण गावाची पाहणी चमुनी केली . निकसाची व प्रस्तावाची तपासणी करून ज्यामध्ये रेन हार्वेस्टिंग, व्यक्तिगत व सार्वजनिक शौचालय , व्यक्तिगत व सार्वजनिक शोषखड्डे , नाडेप टाकी , गांडूळ खत निर्मिती, कचरा विलगीकरण केंद्र, ओला कचरा, सुका कचऱ्याच्या कुंड्या, गावातील सौंदर्यीकरण , हात धुण्याची व्यवस्था, परसबाग, वृक्ष संवर्धन, गावातील रस्ते, सांडपाण्यांच्या नाल्या, सामान्य कर व पाणीपट्टी कर, अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, इत्यादी शासकीय कार्यालयाच्या इमारती तेथील व्यवस्था, गावातील रंग रांगोळी, गावात राबविले जाणारे विविध उपक्रम, व गावातील स्वच्छता इत्यादी ठरवून दिलेल्या निकसाप्रमाणे सर्व बाबींची तपासणी करण्यात आली. गावाचे निरीक्षण जिल्हास्तरीय करते वेळी विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य ,जेष्ठ नागरिक यांनी आपली उपस्थिती दाखवून जिल्हा स्तरीय चमूला सहकार्य केले. मागील एक वर्षापासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेकरिता टांगा गावाने तयारी केली होती. जिल्हास्तरीय तपासणी चमूने गावाची पाहणी करून समाधान व्यक्त केला.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें