गडकिल्ला परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या विरोधात पुन्हा आंदोलन…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आत्मदहनाचा प्रयत्न दोनशेवर अतिक्रमणधारकांना अटक व सुटका,पोलिस ठाणे परिसरात तणाव….

पवनी येथील गडकिल्ला परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या मुद्द्यावरून नागरिक संतप्त झाले. दरम्यान, या नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी विदर्भ क्रांती युवा मोर्चाचे हर्षल वाघमारे यांच्यासह अनेकांना प्रतिबंधात्मक कारवाईखाली ताब्यात घेऊन नंतर सुटका केली. दरम्यान, अतिक्रमण मोहीम स्थगित करण्यासाठी काँग्रेसकडूनही गुरुवारी तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.शहरातील गडकिल्ल्याला लागून असलेले अतिक्रमण काढण्याचे शासनाचे आदेश असल्याने १८३ अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या आदेशाला अतिक्रमणधारकांचा विरोध आहे. पुनर्वसन करून राहण्याची सोय करा, नंतरच अतिक्रमण हटवा,अशी अतिक्रमणधारकांची मागणी आहे.

दरम्यान या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा इशारा देत हर्षल कायालयाच्या परिसरात साहित्य नेतृत्वाखाली जमा झालेल्या अतिक्रमणधारकांनी लाकडाची होळी करून ती पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून सुटका करण्यात आली.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें