खैरलांजी परिसरात वाघाचे दर्शन परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मोहाडी तालुक्यातील कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या परिसरात मागील दोन महिन्यापासून वाघाच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.४ डिसेंबरला पिटेसुर येथील व्यक्ती मासेमारी करण्याकरिता गेला असता वाघाने त्याची शिकार केली होती.त्यानंतर लगेच १२ डिसेंबरला सोरणा येथे वाघाने गाय व म्हशीची शिकार केली. दोन दिवसानंतर पुन्हा जांब ते लोहारा मार्गावर एका शेतामध्ये वाघाने डुकराची शिकार केल्याचे आढळून आले.परिसरातील या सर्व घटनांमुळे शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत.परंतु वन विभाग मात्र वाघाला अजूनही जेरबंद करू शकले नाही ही चिंतेची बाब असली तरी अश्याच मोहाडी तालुक्यातील खैरलांजी येथे जांब खैरलांजी मार्गावर असलेल्या शेतशिवारात शेतीचे कामे करण्यासाठी महिला गेली असता पल्लवी ढेंगे नामक महिलेला पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ही महिला गावालगतच्या शेतशिवारात काही कामानिमित्त गेली असता तिला अचानक समोर पट्टेदार वाघ दिसला. सुदैवाने वाघाने कोणतीही हानी पोहोचवली नाही,मात्र घाबरलेल्या महिलेने तत्काळ गावात येऊन आपल्या कुटुंबीयांना व गावकऱ्यांना ही घटना सांगितली.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें