रेती माफियांचा रात्रीचा खेळ बिनधास्त सुरू असताना, लाखनी पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर जोरदार तडाखा दिला आहे.लाखनी तालुक्यात रात्रीच्या अंधारात विनानंबर प्लेटच्या वाहनांनी रेती तस्करीचा धंदा जोमात सुरू असतांना लाखनी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खेडेपार येथे २५ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आणि टिप्पर जप्त केला आहे.पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने खेडेपार परिसरात गस्त घालत पिवळ्या रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा टिप्पर (क्र. एम.एच. ४० एके ३६१४) पकडला. या टिप्परमधून ५ ब्रास रेती अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे आढळले. टिप्पर चालक अनंता तुकाराम लांबकाने (वय ३४, रा. बाम्हणी, ता. साकोली) याला ताब्यात घेण्यात आले. टिप्परसह जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत २५ लाख ३० हजार ५०० रुपये आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 40