साकोली विधानसभा मतदार संघातील साकोली, लाखांदूर, लाखनी तिन्ही तालुक्यातील शेतकरी खरेदी विक्री सोसायटीची निवडणुक काल पार पडली तर आज मतमोजणी झाली आहे. यात तिन्ही ठिकाणी नाना पटोले पुरस्कृत परिवर्तन पॅनल विजयी झाली आहे. तर साकोली खरेदी विक्री संस्थेत 25 वर्षांनंतर काँग्रेसचा झेंडा रोवला गेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नाना पटोले यांनी आपला गड राखला असल्याने आता येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणुक महत्त्वाची मानली जात आहे.
Author: vbn newsnetwork
Post Views: 54









