भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला माईन्स येथे गावातीलच आरिफ सलाम शेख नामक व्यक्तीने कोंबड्या खाणाऱ्या कुत्र्यावर छर्रा बंदुकीने फायर करुन मारल्याची घटना उघडकीस आली आहे.तुमसर तालुक्यातील चिखला येथील राहुल चंद्रवार (२२) हा घटनेच्या वेळी गावातील दुर्गा चौकातून आपल्या मित्रांसोबत रामायण कथेचा कार्यक्रम आटोपून घराकडे जात असतांना त्याच्या पाळीव कुत्र्याला त्याच्याच घराजवळ आरोपी आरिफ शेख याने छर्रा बंदुकीने फायर करुन मारले.तेव्हा राहुल याने त्याला विचारले असता आरोपीने या कुत्र्याने माझ्या ४० कोंबड्या मारुन खाल्ल्या, म्हणून या कुत्र्याला छर्रा बंदुकीने मारल्याचे सांगितले.त्यानंतर आरोपीने सदर कुत्र्याला गावाबाहेर जमिनीत पुरले. राहुल चंद्रवार याचे तक्रारीवरुन गोबरवाही पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 10