भंडारा जिल्हातील लाखांदूर तालुक्यातील चिचाळ कोदामेडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोदामेडी गावातील सांडपाण्याच्या नाल्या ग्रामपंचायती ने पावसाळा सुरु होण्याआधी साफ सफाई न केल्यामुळे गेल्या आठ दिवसात पासून होणाऱ्या सततदार पावसामुळे गावातील नाल्या तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळे समस्त कोदामेडी वाशीयांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने गावामध्ये असंतोष आहे. कोदामेडी हे गाव अतिशय संवेदनशील गाव आहे. या गावांमध्ये जास्तीत जास्त नाथ जोगी समाजाची लोक मोठ्या प्रमाणे राहत आहे. आजही हा समाज विकासापासून कोसो दूर आहे. पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंगू, मलेरिया चे मच्छर साचलेल्या पाण्यापासून तयार झाले आहेत आणि त्यापासून माणसाला आजाराची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत चिचाळ येथील प्रशासनाला माहीत असून सुद्धा जाणीवपूर्वक कोदामेडी येथील नाल्यांची सफाई करण्यात आली नसल्याचे गावकऱ्यांनी आरोप केला आहे. गावकऱ्यांनी लेखी व तोंडी तक्रारी ग्रामपंचायतला देऊन सुद्धा आजपर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाने कोदामेडी येथील नाल्या साफ न केल्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये साचून परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झालेअसून.गावातील सांडपाण्यांच्या नाल्या साफ करण्यात याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावाकऱ्यांनी दिला आहे.
