केबल चोरी करणारे १० चोरटे अटकेत ७ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

केबल वायर चोरी करणाऱ्या १० चोरट्यांना गोबरवाही पोलिसांनी अटक केली आहे . त्यांच्या ताब्यातून केबल वायर, स्कॉर्पिओ कारसह साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोबरवाही पोलिस ठाण्याचे पोलिस पथकासह गस्तीवर असताना पाथरी ते कवलेवाडा मार्गावरील झुडपी जंगलात केबल वायर वरील प्लास्टिक काढताना आढळून आले होते . आरोपींच्या ताब्यातून केबल वायर, स्कॉर्पीओ वाहन व अन्य मुद्देमाल असा ७ लाख ४० हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.पोलिस उपनिरीक्षक गिते यांच्या तक्रारीवरुन गोबरवाही पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें