भंडारा शहरातून निर्माण होणारी वाहतुकीची कोंडी आणि जनतेला होणारा त्रास लक्षात घेता तयार करण्यात आलेल्या भंडारा बायपास मार्गाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५३ वर वाढत जाणारी जड वाहनांची वाहतूक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती.भंडारा शहराला बायपास मार्ग असावा यासाठी पाठपुरावा केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाला मंजुरी दिली.त्यांच्याच हस्ते भूमिपूजनही करण्यात आले होते.१४ किलोमीटर लांबीचा ७३५ कोटी रुपये खर्च झाले आहे.याचवेळी अन्य प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमिपूजन नीतीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 32