कारधा पवनी मार्गावर भीषण अपघात…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दोन ट्रॅकची सामोरा समोर धडक एकाचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी…

कारधा-पवनी मार्गावरील बाम्हणी गावाजवळ दोन ट्रक एकमेकांवर धडकल्याची घटना घडली असून यात एका ट्रकचालकाचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला.तर क्लिनर जखमी झाला.यशवंत दामू बोपचे (२८) रा. पारडी नागपूर, असे मृतकाचे तर कुणाल उके (२०) रा.नागपूर असे जखमीचे नाव आहे. मृतक व जखमी हे ट्रक क्र.एमएच ४० सीटी १४५० या ट्रकने पवनीकडून भंडाराकडे जात असतांना विरुद्ध दिशेने येणारा ट्रक क्र. एमएच ४० बीजी ३५३६ या ट्रकला विरुद्ध दिशेने जाऊन आदळला.त्यात ट्रक क्र. एमएच ४० सीटी १४५० या ट्रकची कॅबीन पूर्णतःचकनाचूर होऊन ट्रकचालक यशवंत बोपचे याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला.तर ट्रकमधील क्लिनर कुणाल उके जखमी झाला.अपघाताची माहिती पवनी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमीला उपचाराकरीता रुग्णालयात पाठविण्यात आले.घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनाकरीता ग्रामीण रुग्णालय पवनी येथे पाठविण्यात आले.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें