भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ येथील अशोक नगर येथे स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी मोठी कारवाई करीत १ लाख २० हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि ५ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले.पोलिसांनी मोहम्मद हसन जाकीर अली सय्यद (५४) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सय्यद याच्या घरावर व वाहनावर छापा मारून हा मुद्देमाल जप्त केला.अड्याळ परिसरात या प्रकारच्या प्रतिबंधित तंबाखूच्या विक्रीवर मागील काळातही अनेक कारवाई झाल्या आहेत.जिल्ह्यातील काही विक्रेते लपून-छपून तंबाखू विक्री करत असल्याच्या चर्चा सुरू आहे.विशेष म्हणजे याच दिवशी पोलिसांनी छत्तीसगडकडे जाणारा डोडा जप्त केला होता.स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस विभागाने अशा प्रतिबंधित पदार्थावर कडक कारवाई करण्यास प्राधान्य दिले आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 43