एकाच दिवशी एक मजूर दोन कामांवर !हिवरा येथे पांदण रस्त्याच्या कामात गैरव्यवहार…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मोहाडी तालुक्यात रोजगार हमी योजनेची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली असून दिवसेंदिवस गावागावातील पांदण रस्त्याच्या कामात होत असलेले घोटाळे उघडकीस येत आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात कोट्यवधी रुपयांची कामे तालुक्यातील प्रत्येक गावात करण्यात आली. परंतु या कामातून गरीब कष्टकरी वर्गाच्या हाताला रोजगार मिळण्या ऐवजी ठेकेदार आणि सत्ताधारी नेत्यांचे खिसे भरले गेल्याचे चित्र तालुक्यात समोर आले आहे.
मजुरांना प्रत्यक्ष कामावर न बोलवता यंत्राच्या सहाय्याने कामे करून आणि खोट्या मजुरांची नावे मस्टरमध्ये दाखवून त्यांच्या नावाने आलेले पैसे लाटले गेले.

भंडारा जिल्ह्याच्या हिवरा येथे रोजगार हमी योजने अंतर्गत पांदण खडीकरण रस्त्याचे काम कागदोपत्री दाखवून शासनाच्या निधीचा अपहार करण्यात आला आहे. कागदोपत्री दाखविण्यात आलेल्या या पांदण रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे मातीकाम प्रत्यक्षात झालेले नाही. विना रॉयल्टीचा पातळ मुरूम वापरून शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात आला. गावातील १५ ते २० व्यक्तींची खोटी नावे मस्टरमध्ये मजूर म्हणून दाखवून त्यांच्या नावे पैसे काढण्यात आले. गावातील सर्वच नागरिक रोजगार हमीच्या कामावर जात नाही. परंतु जवळपास ३५ ते ४० व्यक्तीं अशी आहेत जी कामावर न जाणारी आहेत त्यांची नावे दाखवून त्यांच्या नावावर पैशांची उचल करण्यात आली. एकंदरीत जे नागरिक कधीही कामावर जात नाही किंवा जे बाहेर कामावर असलेले मजूरही हजेरीपटावर दाखवून पैशाची उचल करण्यात आली.
इतकाच नाही तर एक मुलगी मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास अंतर्गत गावातील शाळेत लागली आहे. तिच्या नावाचा देखील फायदा घेत रोजगार हमीचे पैसे काढण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे. तर सरपंच यांनी आरोप फेटाळून लावले असून चौकशी झाल्यावर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं आहे.

आता हा प्रकरण जिल्हा परिषदेच्या दालनात गेला आहे. हा संपूर्ण प्रकार गंभीर असून चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई केली जाणार आहे..

भंडारा जिल्ह्यात झालेला प्रकार गंभीर आहे. हा प्रकार फक्त मोहाडी तालुक्या पुरता मर्यादित नसुन संपूर्ण जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामत अनियमितता झाली आहे… रोजगार हमीचे काम हे अधिकारी व पदाधिकारी यांच्यासाठी कुरण ठरत आहे….

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें