उन्हाळी धान मळणीला प्रारंभमात्र खरेदी केंद्र बेपत्ता….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

खरिपाप्रमाणे फसगत नको, शेतकऱ्यांच्या अपेक्षा…… तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी……

हवामान खात्याने यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता वर्तविली असताना सध्या अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यातच उन्हाळी धान पिकाची कापणी व मळणी सुरू झालेली असताना अद्यापही शासकीय हमीभाव केंद्र बेपत्ता असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खरीप हंगामात खरेदी केंद्र दोन महिने उशिरा सुरू झाले. निदान उन्हाळी हंगामासाठी दिरंगाई होऊ नये, अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. भंडारा जिल्ह्यात यंदा ४८ हजार ९२३ हेक्टरवर उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली असून सध्या धान कापणी व मळणीला प्रारंभ झाला आहे. परंतु, जिल्ह्यात पणन महासंघाचे शासकीय खरेदी विक्री अद्यापही सुरू झालेले नाहीत. शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान विकावी कुठे हा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे तात्काळ दान खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें