मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात नॉयलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापला. लाखनीच्या उड्डाण पुलावरून गोरेगावकडे जाणाऱ्या युवकाच्या गळ्यात नॉयलॉन मांजा अडकल्याने गळा कापला गेल्याने प्रचंड रक्तस्राव होऊन तो उड्डाण पुलावरच पडला.
शुभम जियालाल चौधरी असे या २४ वर्षीय युवकाचे नाव असून तो गोरेगाव (जि. गोंदिया) येथील रहिवासी आहे. सायंकाळी तो आपल्या दुचाकीने भंडाराकडून गोंदियाकडे जात असताना लाखनी उड्डाण पुलावर ही दुर्घटना घडली. पतंग कटल्याने उड्डाण पुलावर अडकून पडलेला नायलॉन मांजाचा फास त्याच्या गळ्याला बसला. काही नागरिकांनी तत्काळ त्याला रूग्णालयात पोहचविण्याचे त्याचा जीव वाचल्याचे स्वतः शुभम ने सांगीतले आहे.
