ईटखेडा शमशान घाट परीसरात जख्मी अवस्थेत असलेल्या बिबट्याला रेस्क्यू करण्यात वन विभागाला मिळाले यश..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अर्जुनीमोर वनक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या ईटखेडा येथील श्मशान घाट परीसरात बिबट जख्मी अवस्थेत असून, तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, बिबट्या असल्याचे व्हिडिओ सुद्धा काही वेळातच सोशल मीडिया सुद्धा चांगलेच व्हायरल झाले, आणि याची माहिती सुद्धा वन विभागाला देण्यात आली, आणि काही वेळातच वन विभाग चमुसह घटनेस स्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार बिबटला बेशुद्ध करुन सुखरूप पकडण्यात आले. विशेष म्हणजे जखमी बिबट हा तीन वर्षाच्या मादी बिबट असुन पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्याच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर सदर मादी बिबट्यास शुद्धीवर आणले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार मादी बिबटयास पुढील उपचाराकरीता टी.टी.सी नागपुर ला पाठविण्यात आले आहे

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें