भंडारा जिल्ह्यात भाजपाने मिशन कमळ सुरू केलं आहे. तुमसर येथे भाजपाने पक्ष प्रवेश कार्यक्रम घेतला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी शिक्षणं सभापती धनेंद्र तुरकर यांनी विधानसभा निवडणूकीत बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. तर धनेंद्र तूरकर यांनी आपल्या कार्यकर्ता सोबत भाजपात प्रवेश केला आहे. जिल्ह्यात भाजपाला बळकट करण्यासाठी प्रवेश व सदस्य नोंदणी कार्यक्रम जोरात सुरू असुन विधान परिषद सदस्य परिनय फूके यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नव्याने उभारी घेत आहे.
