भंडारा जिल्हातील भेल प्रकल्प राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकारने भूमी पूजन करून साकोली तालुक्यातील मुंडीपार येथील गावाकऱ्यांची जमीन हसतांतरित करण्यात आली होती. मात्र काही कारणामुळे भेल प्रकल्प सुरु होऊ शकला नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले तरीपण प्रकल्प सुरु होऊ शकला नाही. मात्र आज 12 वर्षानंतर आमदार परिणय फुके यांच्या नेतृवात भेल प्रकल्प ची गेट खोलून शेती साठी सुरु करण्यात आली असून परिणय फुके यांनी चक्क ट्रॅक्टर वर बसून नांगरणी केली तर धानाची पेरणी करून शेतकऱ्याकरिता शेती करिता गेट सुरु करून भेल शेतकरी प्रकल्प ग्रस्त संघटनेला यश मिळाल असून गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 18