आता घरकुल बांधकामासाठी मिळणार मोफत वाळू….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्रातील घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थीना जवळच्या वाळू डेपोमधून वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्यामुळे घरकुल लाभाथ्यांनी शासनाचे आभार मानले आहे. पंतप्रधान आवास योजनेतून राज्यासाठी ३० लाख घरकुले दिली आहेत. या घरकुलांना मोफत वाळू देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारलेले आहे. मात्र, या घरकुलांना वाळू मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. यासाठी तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्याऱ्यांची मदत घेऊन ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व घरकुल लाभार्थीना घरपोच वाळू रॉयल्टीची पावती पोहच करण्याचे शासनाने आदेश दिले आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पात्र घरकुल लाभाथ्यांकडून रेती अर्ज आणि आधार कार्ड ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून ग्रामपंचायत स्तरावरून पुढील कारवाईसाठी रेती संदर्भात पाठपुरावा करण्यात येत असल्याने घरकुल लाभाध्यांना रेती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री आवास योजनेचे कामे सुरू असून रेतीअभावी घरकुल लाभार्थी आपल्या घराचे काम करू शकले नाहीत. त्यामुळे घरकुल लाभाथ्यांना पाच ब्रास मोफत रेतीच्या आदेशान्वये घरकुल लाभार्थीचे घराचे स्वप्न आता पूर्ण होणार.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें